उस्मानाबादमध्ये फुटले दोन पाझर तलाव, नागरिकांचे स्थलांतर

मुर्शदपूर आणि परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण येथील फुटले दोन पाझर तलाव

0

उस्मानाबाद :  उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचे थैमान सुरू असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले आहे  परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला असून कोणतीही जीवितहानी  नाही.  राज्यात विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे धरणांतील पाण्यांच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नद्यांच्या  पात्रात पाणीवाढ झाली.  उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर आणि परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण येथील दोन पाझर तलाव फुटले

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहाकार समोर आला असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले आहे  परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला असून कोणतीही जीवितहानी  नाही. पुरातील पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बेडगा येथील 2 , गुंजोटी 3 , राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षितस्थळी हलविले. उमरगा तालुक्यातील कदेर येथील अडकलेल्या 2 जणांना काढण्यासाठी एअर लिफ्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसानं हाहाःकार माजला आहे. लोहारा, उमरगा परिसरात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना मोठा पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतात काढून ठेवलेल सोयाबीन गेल वाहून तर दुसरीकडे ऊसाच शिवारही पाण्याखाली गेल आहे. पाण्याच्या प्रवाहानं शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.