पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

0

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी हल्ला झाला. यात 44 जवान शहीद आहेत. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा सामावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत तर बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील नितीन शिवाजी राठोड या दोघांचा शहीद जवानांमध्ये समावेश आहे. या जवानांची शहीद झाल्याची बातमी आल्यानंतर दोघांच्या गावात मोठा आक्रोश झाला. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या घरी गर्दी केली.

8 मे 1973 रोजी जन्मलेले संजय राजपूत हे बटालियन 115 मध्ये कार्यरत होते. संजय राजपूत यांची 20 वर्षांची सेवा पूर्ण झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या सेवेचे पाच वर्ष वाढवून घेतले होते. त्यांना 13 आणि 10 वर्षांची दोन मुले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वीच संजय राजपूत यांच्या एका भावाचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संजय राजपूत यांच्या जाण्याचे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तसेच या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चोरपांगरा गावचे नितीन शिवाजी राठोड यांना वीरमरण आले. नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन, मुलगी जीविका, आई सावित्रीबाई राठोड, वडील शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण राठोड आणि दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. नितीन राठोड शहीद झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.