पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

शिवाजी नगर बाळे येथे पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्याकडेला उभ्या कारला ट्रकची जोरदार धडक

0

सोलापूरः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी गाडीचे पंक्चर काढणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगर बाळे येथे पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे दोन तुणांचा जागीच मृत्यू झाला

सारंग प्रकाश रणदिवे, संजय विठोबा अभंगे, अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे असून, ते कामानिमित्त सोलापुरात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने ते रवाना झाले होते, मात्र बाळे नजीक गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे बाळे येथील एका हॉटेलजवळ ते थांबले होते, दरम्यान ,पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असाच भीषण अपघात झाला होता. त्यात 9 विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. पुणे-सोलापूर मार्गावर लोणी-काळभोर इथे भरधाव एर्टिगा कारनं ट्रकला धडक दिली. त्यात 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे-सोलापूर मार्गावर ही अपघातांची मालिक सुरूच आहे. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातांत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन ते चार जण गंभीर जखमी होते.

दुसऱ्या एका अपघातात रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात गॅस वाहून नेणाऱ्या कंटेनरचे पुढील चाक अडकले, यामुळे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेकडील रस्त्यावर गेल्याने दोन कार त्याला धडकल्या. या अपघातात एकाचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. रात्रीच्या सुमारास झालेल्या या तिन्ही अपघातांची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. येथे पावसाचा जोरही अधिक असल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.