वाळूज महानगरात अपघात सत्र सुरूच, बेशिस्त वाहतुकीचा एक बळी तर ५ जखमी

0

औरंगाबाद : वाळूज महानगर परिसरात बेशिस्त वाहतुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या सत्रात वाढ होत आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपुरातील तिरंगा चौकात गुरुवारी रात्री अज्ञात वाहणाने एका पादचाऱ्यास चिरडल्याने त्याचा तडफडून जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा अपघात याच महामार्गावरील बजाज ऑटो कंपनीच्या मटेरियल गेटसमोर घडला. वळण घेण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने समोरील कारला जोराची धडक दिल्याने कारमधील चालकांसह ५ जण जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.