शिवसेना खासदारांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी

खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी जीवितास धोका; नानलपेठ पोलिसात तक्रार

0

परभणी : लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे. दोन कोटी रुपयांची सुपारी देऊन नांदेडच्या टोळीमार्फत आपल्याला संपविण्याचा कट शिजत असल्याचं त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा  दाखल करण्यात आला नाही. मंगळवारी रात्री उशिरा खासदार जाधव यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली. नांदेड येथील एका टोळीला दोन कोटी रुपयांची सुपारी देणारा व्यक्ती परभणीतील असावा, असा संशय आपल्याला असल्याचे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. खासदार संजय जाधव यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचे वृत्त समजतात शिवसैनिकांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संजय जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पूर्ण चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.