नागपंचमीसाठी सासुरवाडीला निघालेल्या जावयासह दोन मुले पुरात गेली वाहून

'अमृता' नदीच्या पुलावर पुराचा अंदाज न आल्याने घडली घटना

0

गेवराई : गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली.नागपंचमीसाठी दोन मुलांना दुचाकीवरून सासुरवाडीला घेऊन जाताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील बाप-लेकासह मुलगी वाहून गेल्याची घटना अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली.

गेवराईतील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. नागपंचमीसाठी दोन मुलांना दुचाकीवरून सासुरवाडीला घेऊन जाताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील बाप-लेकासह मुलगी वाहून गेल्याची घटना अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. शेवगाव तालुक्यातील कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३२) यांची देवपिंप्री ही सासुरवाडी असून गुरुवारी रात्री आठ वाजता ते बालमटाकळी येथून मुलगा प्रथमेश (८) व वैष्णवी (६) या दोघांना घेऊन देवप्रिंप्रीकडे निघाले. याच वेळी पौळाचीवाडी येथील अमृता नदीला पावसामुळे पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने घोरपडे हे दोन मुलांसह वाहून गेले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी मुलीचा मृतदेह व दुचाकी सापडली असून बाप-लेकाचा शोध सुरू आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता कृष्णा घोरपडे यांनी “मी पौळाचीवाडी जवळ आहे, आता खूप पाऊस पडतोय’ असा फोन केला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही. हा शेवटचाच फोन ठरला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.