जालन्यात शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

धनगरप्रिंप्री गावात ही हृदय पिळवटणारी घडली घटना

0

जालना : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे . जालना जिल्ह्यातील धनगरप्रिंप्री गावात ही हृदयद्रावक घटान घडली आहे. वैष्णव ज्ञानेश्वर बहुले आणि गौरव ज्ञानेश्वर बहुले, अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. ते सातव्या आणि चौथ्या वर्गात शिक्षण घेत होते.

जालना जिल्ह्यातील धनगरप्रिंप्री गावात ही घटना घडली. हे दोघेही भाऊ आईसोबत शेतात गेले होते. सायंकाळच्या सुमारास आईने त्यांना घरी जायला सांगितले. तेव्हा दोघेही घरी जाण्यासाठी निघाले. मात्र दोघेही घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरु झाला. शेततळ्याच्या गेटवर एकाची चप्पल आढळून आली. तेव्हा शेततळ्यात शोध घेतला असता, दोन्ही मुले शेततळ्यात आढळली. वैष्णव ज्ञानेश्वर बहुले आणि गौरव ज्ञानेश्वर बहुले, अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. ते सातव्या आणि चौथ्या वर्गात शिक्षण घेत होते.त्यांना तात्काळ शेततळ्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.