बारावी उत्तीर्ण युवकाने शोधला, उदरनिर्वाहासाठी स्वतःच रोजगार
कोरोना संकटकाळात घरबसल्या कामासाठी त्याला लहानपणीचा छंद आला कामी
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील बारावी उत्तीर्ण युवकाने कोरोनाच्या संकटकाळात घरबसल्या स्वतःचा रोजगार शोधला, या कामासाठी त्याला लहानपणीचा छंद उपयोगी आला.
गावातील तरुणांचा लोकप्रिय असलेला युवक योगेश तेजराव चव्हाण याने बाज विणणे च्या कामातून महिन्याकाठी 25 ते 30 हजार रुपये यांचा रोजगार निर्माण केला.
कोरोनाच्या संकटकाळात राज्यासह देशभरात लॉकडाऊन असताना शेतात पिकलेल्या शेतीमालाला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर ही उपासमारीची वेळ आली होती या आर्थिक संकटात योगेशचे कुटुंबही सापडले. परंतु योगेशने या संकटात न खचून न जाता लहानपणीचा बाज ( खाट) विणण्याचा छंद होता. त्यांनी त्या छंदाचा व्यवसायात रूपांतर करून बाज बनविण्याचे काम सुरू केले. यावेळी त्याला परराज्यातील बाज विणण्याचा अनुभव कामी आला.
लहानपणी काही कामानिमित्त योगेशला अोडिसा राज्यात जाण्याचा योग आला. तिथे त्यांनी बाज विणण्याचे काम बघितले होते ते त्यांनी लक्षात घेऊन घरी आल्यानंतर त्याच पद्धतीने बाज विणण्याचे काम सुरू केले. कोरोनाच्या काळात योगेशने स्वतःच्या राहत्या घरी सामाजिक अंतर ठेवून कोरोनाचे नियम पाळून रंगीबेरंगी रंगांचे बाज खाट बनविली. कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता आणि कोणत्याही प्रकारचा कागदावर नकाशा न करता स्वत: त्याच्या कल्पकतेने तो वेगवेगळ्या डिझाईनचे आकर्षक कलर्सचे बाज बनवितो.
आजही या बाजीला चांगलीच पसंती असून त्याच्याकडे एक महिन्याच्या कालावधीची बाज मिळविण्यासाठी वेटिंग आहे. वेगवेगळे साईजच्या बाजी असून साधारणपणे सहा हजार रुपये पर्यंत एका बाजीची विक्री होते. योगेश या कामामुळे पाईप व्यावसायिकांनाही काम मिळाले असून रेशीम दोरीची ही मोठी उलाढाल होते.
लॉकडाऊनमुळे शेतीव्यवसाय व्यवसाय व्यतिरिक्त इतर काम करण्याचा प्रसंग माझ्यावर ओढून आला आहे. त्यामुळे मला लहानपणी असलेला छंदाचे रूपांतर व्यवसायात करून आज मी माझा स्वतःचा रोजगार शोधला. मला आणखी माझ्या कामासाठी मजुरांची गरज भासणार असल्याचे योगेश चव्हाण यांनी सांगितले.
या बाजीमुळे वयस्कर माणसांचे शरीर दुखत नाही. एरवी आपण पलंगावर झोपल्यानंतर पाठदुखीचा त्रास असतो तो मात्र या बाजीवर झोपल्यानंतर नाहीसा होतो. यासह इतरीही महत्व बाजीचे शरीराशी जोडलेले आहे. त्यामुळे या बाजीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आजघडीला बाज बनविण्याचे काम मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जात नाही, त्यामुळे जो कोणी ही बाज बनवतो त्या व्यक्तीकडे बाज बनविण्यासाठी मोठी मागणी असते.