छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने खुलताबाद तालुक्यात वृक्ष लागवड

खुलताबादचे तालुकाध्यक्ष जयराम पा. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम....

0

पैठण : पैठण तालुक्याचे भूमिपुत्र अनिल राऊत यांनी छावा क्रांतीवीर सेना या संघटनेत मोठी घोडदोड केली असून, अनिल राऊत यांनी पैठण तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष त्यानंतर शेतकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष व आता ते फादर बॉडीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पर्यंत मजल मारत विविध पदे भूषवली.

पैठण तालुक्यातील अनिल राऊत रहिवाशी असून संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांत त्यांनी विविध कार्यक्रम राबववून छावा क्रांतीवीर सेनेचे नाव झळकावले आहे. त्यांनी छावा क्रांतीवीर सेनेचे खुलताबादचे तालुका अध्यक्ष जयराम पा. जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुलताबाद येथे वृक्ष लागवड व मास्क आणि सॅनिटायझर वाटप करत वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम राबवला. नैसर्गिक साधन सामुग्रीचे जतन करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. वृक्ष लागवड आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे. ही गोष्ट इतरांना सांगण्यापेक्षा याची सुरुवात आपल्यापासून करावी, असा विचार छावा क्रांतिवीर सेना संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांच्या मनात आला. म्हणून मी अनेक तालुक्यांत विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. आज छावा संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, घोडेगाव येथील रेणुका देवी मंदिराच्या मोकळ्या परिसरात सोशल डिस्टन्स पाळत प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांच्या हस्ते वृक्ष लागवड आणि मास्क सॅनिटायझर वाटप करत अनोखे उदाहरण युवकांसमोर ठेवले. या स्तुत्य उपक्रमाची चर्चा परिसरात सुरू आहे.यावेळी स्थानिक नागरिक घोडेगाव सरपंच पांडुरंग जाधव, उपसरपंच दादासाहेब जाधव, ग्रामसेवक सोळुंके, माजी सरपंच मच्छिंद्र जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव, पो.पा कारभारी जाधव, ग्रा.पं. सदस्य जनार्दन चव्हाण, भाऊराव धरम, निखिल कातबने, आनंद आगळे, ग्रामस्थ प्रवीण जाधव, कारभारी जाधव, विठ्ठल जाधव, मनोज जाधव, रामेश्वर जाधव, स्वप्नील जाधव, बाळू जाधव, संदीप जाधव, अनिल जाधव, राजू काळे, गणेश कांडेकर, महेश आल्हाड, कृष्णा लिंगायत, वैभव जाधव, अमित लहाने, रितिक लहाने, वैभव बन, विकास विसपुते, ऋषी लिहिणार आदी उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.