सदगुरू बाबा हरदेवसिंह महाराजांच्या जयंतीनिमित्त बजाजनगर येथे वृक्षारोपण
संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबवले वृक्षारोपण व संवर्धन अभियान
औरंगाबाद : वाळूज महानगर – बजाजनगर येथे सदगुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत निरंकारी मंडळाच्या वतीने रविवार रोजी वृक्षारोपण व संवर्धन अभियान कार्यक्रम घेण्यात आला.
वाळूज महानगर – बजाजनगर येथे सदगुरु बाबा हरदेवसिंह महाराजांच्या जयंतीनिमित्त बजाजनगर येथे निरंकारी मंडळाच्या वतीने संत निरंकारी मंडळाच्या वतीने रविवार रोजी वृक्षारोपण व संवर्धन अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे महत्वाची उपस्थिती होती. बजाजनगर येथील सारा संगमच्या मैदानात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निंब, सप्तपर्णी, वड, बदाम आदी विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संवर्धन व संगोपनाची शपथ घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग व मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाळूज महानगर निरंकारी मंडळाचे शिवाजी कुबडे, संत निरंकारी सेवादल, तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांनी हा उपक्रमम राबवला.