परिवहन मंत्री कोरोनाबाधित, मुख्यमंत्र्यांचा सावध पावित्रा आमदारांची बैठक रद्द

परिवहन मंत्री अनिल परब यांना 'लीलावती' रुग्णालयात दाखल

0

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. अनिल परब यांना कोरोनाची लक्षण असल्याने त्यांना ‘लीलावती’त दाखल केल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेत मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली.

परिवहन मंत्री अनिल परब यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलंं आहे. सध्या त्यांच्यावर ‘लीलावती’त उपचार सुरु आहेत.  सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज ‘वर्षा ‘निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. यात मुंबईतील आमदार सहभागी होणार होते. मात्र अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच, मुख्यमंत्र्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. त्यांनी ‘वर्षा’वर बोलवलेली आजची बैठक रद्द केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनिल परब हे सतत फिल्डवर काम करत आहे. त्या दरम्यान त्यांनी अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली होती. तसेच काही आमदारांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक रद्द केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.