हिजड्याला मुल होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाहीत -नितीन गडकरी

0

भाजप नेते नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक धक्कादायक वादग्रस्त विधान करून चर्चेला उधाण आणले आहे. ते म्हणाले, ‘हिजाड्याशी लग्न केले तर त्याला मुले होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाहीत, असे आम्हाला वाटले होते. परंतु भाजपने ते सिंचन योजना पूर्ण करून दाखवली.’ सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या कामांच्या शुभारंभ करताना त्यांनी असे विधान केले.

तसेच ‘टेंभूसारख्या अनेक महत्वाच्या योजना भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाल्या. शेतक-यांचे स्वप्न पूर्ण झाले.’ असेही गडकरी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित होते.

गडकरी आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. शनिवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते, ‘राजकारणात अपयशाची जबाबदरी घेणारे नेतृत्व हवे.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.