पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदारांची बदली

जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसणार कोण, याचा निर्माण अद्याप नाही

0

पुणे : पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी आणि पाच तहसीलदारांची बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कोण बसणार याचा निर्णय मात्र अद्याप झालेला दिसत नाही. पुणे जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. तर भुदरगडचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांची बदली सोलापूर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

कोरोना संकटाच्या काळातही पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावर कोणाची नियुक्ती होणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांमध्ये देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे.पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी काँग्रेसकडून डॉ. योगेश म्हसे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश देशमुख, तर शिवसेनेकडून जी श्रीकांत, अस्तिक कुमार पांडे यांची नाव पुढे येण्याची शक्यता आहे. कुणाल खेमनार यांची नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यातून बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचेही नाव नव्याने चर्चेत आले आहे.कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे यांची सातारा येथे पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली झाली आहे. तर सोलापूरच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची नलावडे यांच्या जागी म्हणजे कोरेगावच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे विभागातील पाच तहसीलदारांची बदली

पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार विवेक साळुंके यांची बदली सोलापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. साताऱ्यातील पुनर्वसन तहसीलदार शुभांगी फुले यांची पुणे येथे सर्वसाधारण शाखेत बदली झाली आहे. तर उपप्रबंधक एमआरटी तहसीलदार दिगंबर रौंदळ यांना त्याचठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे.पुणे येथील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार सुरेखा दिवटे यांची विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन कार्यालयात बदली झाली आहे. तर आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांची सोलापूर येथे सर्वसाधारण शाखेत बदली करण्यात आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.