“सारिपाट” या चिञपटाचा ट्रेलर ( प्रोमो ) शहरात प्रदर्शित !
औरंगाबाद : अष्टांग मुव्हिज व भारतवाला फिल्म्स निर्मित ” सारिपाट ” या चिञपटाचा ट्रेलर ( प्रोमो ) मौलाना आझाद रिसर्च सेन्टर, सलीमअली सरोवर समोर, टि व्हि सेन्टर रोड, औरंगाबाद येथे प्रदर्शित करण्यात आला. त्याप्रसंगी दीप प्रज्वलन करताना पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता सन्माननीय बाबुरावजी कंदरफळे, जेष्ठ चिञपट दिग्दर्शक डाँ, देवदत्त म्हात्रे नेहरु युवा केन्द्राच्या समन्वृयक श्रीमती अरुणा कोचूरे, चिञपटाचे निर्मिता लेखक दिग्दर्शक संजय राजुरकर, सहनिर्माता शेख कलीम यासिन पटेल भारतवाला, या कार्यक्रमास औरंगाबाद शहरातील जय मांडवे, मदन मिमरोट , जगदिश कोठाळे , यांच्या सह जवळजवळ सर्वच कलाकार उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुञसंचालन डाँ. हरि कोकरे यांनी केले तर आभार अभिनेते संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चिञपटातील कलाकारांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये चिञपटाचे संगीतकार तसेच अभिनेते अतुल दीवे, गायिका वैशाली कुर्तुडीकर , गीतकार अभिनेते रमेश भालेराव , चिञपटाचे प्रमुख कलाकार अभिनेते साहेबराव पाटील, मुख्य नायक फकिरा वाघ, सहदिग्दर्शक भरत अधाने, PRO पंजाबराव मोरे,श्रीरंग शिंदे, अशोक कुलकर्णी ,संजय बनसोडे ,प्रदीप धाडगे पाटील, डाँ.प्रशांत खरात, उदयराजे भासले पाटील , रायभानराजे शिसोदे पाटील , कुसुम मोगरे, किरण शर्मा, मिनाक्षी बनसोडे ,जयसिंग राजपुत , दिनेश राजपुत , मच्छिंद्र बडोखे, बालकलाकार कनिष्क बनसोडे इत्यादींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुन पवार, जाँन भालेराव , अ भा चि म औरंगाबाद विभागाचे व्यवस्थापक शुभम ञिभुवन, श्याम सुंदर भालेराव , सदानंद पांडव व ईतर मान्यवरांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिञपटाचे कलादिग्दर्शक संतोष गायकवाड , बाँबी हिवाळे, मच्छिंद्र बडोखे , ढोलकीपटू राहुल दाभाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.