म्हैसमाळ येथील पर्यटनस्थळ प्रवेश बंदमुळे पर्यटकांचा हिरमोड

इतर राज्यांत लॉकडाऊननंतर पर्यटन स्थळे खुली; मात्र काही ठिकाणी पर्यटनस्थळे सुरूच्या प्रतीक्षेत

0
औरंगाबाद :  कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हापासून सर्व पर्यटन स्थळे, रेल्वे, बस सह आदी सर्वच बंद केले होते. अनलॉक झाल्यामुळे आता  हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्यापही काही पर्यटन स्थळे बंदच  आहेत.
मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण समजले जाणारे  म्हैसमाळदेखील बंद असल्याने पर्यटकांचा  हिरमोड होत आहे.  पर्यटक म्हैसमाळ उघडले की नाही ते पाहण्याकरिता चकरा मारत आहेत. कोसोमैल जाऊनदेखील मैसमाळ गेट बंदच दिसल्याने पर्यटकांना निराश होऊन परतावे लागत आहे. असेच दृश्य शनिवारी आणि रविवारी दिसल्यामुळे
कोरोनाची भीती अजूनही संपुष्टात आलेली नाही. मात्र कोरोनाला बरोबर घेऊन नागरिक आता सर्व काळजी घेऊन काम करत आहेत. त्यामुळे हळूहळू  आता सर्व दैनंदिन परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. इतर राज्यांतील पर्यटन स्थळे उघडण्यात आली आहेत. आपल्याकडे  मात्र पर्यटन स्थळे अजूनही  बंदच आहेत. त्यामुळे पर्यटकांची निराश होत आहे. असेच चित्र म्हैसमाळ येथील पर्यटनस्थळी दिसून आले. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने शेकडो पर्यटक म्हैसमाळ येथे भेटी देण्यासाठी गेले असता, गेटला टाळे बंद दिसल्याने पर्यटकांची निराश झाली. लॉकडाऊन नंतर म्हैसमाळ या निसर्रगम्य ठिकाणी अनेकांचे पाय वळत आहेत. एकतर आधीच खुलताबाद ते म्हैसमाळचा रस्ता अत्यंत खडतर खराब आहे. असे असतानादेखील कोसोमैल या खडतर रत्यावरून  जाताना जीव धोक्यात घालून प्रवास करून  अनेक पर्यटक म्हैसमाळ या ठिकाणी भेटी देत आहेत. म्हैसमाळ पाहण्यासाठी नागरिकांची होत आहे. मात्र म्हैसमाळचे प्रवेशद्वार अद्यापही बंद असल्याने निराश होऊन परतण्याची वेळ पर्यटकांवर येत आहे.  म्हैसमाळच्या  बंद प्रवेशद्वाराचे  बाहेरूनच पर्यटकांनी फोटो काढून निराश होऊन आनंदावर जणू विरजन पडल्याचे प्रतिक्रिया देण्याशिवाय आणि हिरमुसल्याशिवाय  पर्यायच नव्हता .औरंगाबाद शहर हे पर्यटनाची राजधानी आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक देश विदेशातून येतात. शहरातील हजारो पर्यटकदेखील पर्यटन स्थळांना भेटी देतात. त्याचा फायदा अनेकांना होतो. मात्र अनलॉक होऊनही पर्यटन स्थळे बंद आहेत. इतर राज्यांत लॉकडाऊननंतर पर्यटन स्थळे उघडण्यात आली आहेत. परंतु आपल्याकडील पर्यटन स्थळे बंद का? असा प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.