उद्या कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती मानवी साखळीसह देशव्यापी संपात उतरणार

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृति समितीच्या वतीने देशव्यापी संप, मानवी साखळीसह निदर्शने

0

औरंगाबाद  : वाळूज एमआयडीसी भागात २६ नोव्हेंबरला मानवी साखळीसह कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृति समिती संपात उतरणार आहे. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृति समिती च्या वतीने देशव्यापी संप ता. २६ नोव्हेंबर २०२० रोजी हाेत आहे.

वाळूज एमआयडीसी भागात कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी हा संप हाेत असून ओयासिस चौक ते गुडईअर चौकापर्यंत मानवी साखळीसह निदर्शने करण्यात येणार आहेत. कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृति समिती च्या वतिने मंगळवार राेजी सिटू कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहीती देण्यात आली आहे. यावेळी साथी सुभाष लोमटे, प्रभाकर मत्ते कॉ. प्रकाश बनसोडे,दामोदर मानकापे, एम. एफ. गफ्फार,अ‍ॅड. अभय टाकसाळ,सुभाष लोमटे, श्रीकांत फोपसे, बुद्धीनाथ बराळ,सुभाष पाटील, कॉ लक्ष्मण साक्रुडकर, कॉ म़गल ठोंबरे,शंकर ननुरे सह आदींची उपस्थिती हाेती.या संपात युनियन– सिटू , आयटक, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र कामगार विकास संघटना , पॅंथर पावर , न्यू पॅंथर पावर, इंटक, मराठवाडा विकास सेना, सिमेन्स वर्कर्स युनियन बिकेटी , विप्रो, एन आर बी, ईत्यादी संघटना सहभागी हाेणार आसल्याचे प्रसिद्धी प्रमुख कॉ. शंकर ननुरे यांनी माहिती दिली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.