बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबरला होणार मतदान

0

पाटणा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत.  मुजफ्फरपूर मतदारसंघात सर्वाधिक 28 उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी 9 उमेदवार आमने-सामने आहेत. शेवटच्या टप्प्यात सीमांचल या मुस्लीम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचलमधील काही जागांवरही ‘कांटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात महाआघाडीतून काँग्रेसचे 25 तर आरजेडीचे 46 उमेदवार रिंगणात आहेत. तर एनडीएकडून भाजप ३५ जागांवर आणि जेडीयू 37 जागी लढत आहेत. 5 ठिकाणी सीपीआय (माले), तर 2 ठिकाणी सीपीआयने आपले उमेदवार उतरवले आहेत. याचबरोबर व्हीआयपी 5 तर ‘हम’ एका जागेवर निवडणूक लढवत आहे. तर एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनी जवळपास 2 डझन जागांवर दंड थोपटले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.