शाहीरावर भाजीपाला विक्रीची वेळ, कोरोनाने लोककलावंतांची उपासमार

शासनाने लोककलावंतांच्या हितासाठी उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा

0

नाशिक : जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी या काळात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. इतर वर्गांप्रमाणेच लोककलावंतांना देखील कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव  बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव  यांच्यावर अक्षरशः भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव आणि त्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनने बहुतांश सर्वच क्षेत्रांतील अनेकांचे रोजगार हिरावले गेले. लोककलावंतांवरही कोरोनाने पोटापाण्यासाठी वेगळा पर्याय निवडण्याची वेळ आणली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लोककलावंत शाहीर मधूकर जाधव यांनाही चरितार्थासाठी  वेगळा पर्याय निवडावा लागला. बायकोच्या गळ्यातील डोरले मोडून मधूकर जाधव यांनी भाजीपाला व्यवसाय उभा केला. यातून मिळणार्‍या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. शासनाने लोककलावंतांची दखल घेऊन लोककलावंतांच्या हितासाठी काहीतरी उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.