शिर्डी : कोरोना संकटात अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर गंडांतर आले. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, ग्रंथालयं सुरू करण्यात आली. पण मंगल कार्यालये आणि लॉन्स सुरू करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे एका लग्नावर अवलंबून असलेले समाजातील जवळपास 24 घटक सध्या उपासमारीचा सामना करत आहेत.
मंगल कार्यालये आणि लॉन्स सुरू करण्यास राज्य सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे एका लग्नावर अवलंबून असलेले समाजातील जवळपास 24 घटक व्यावसायििक सध्या उपासमारीशी सामना करत आहेत. त्यात मंगलसेवा, वाजंत्री, ऑर्केस्ट्रा, फोटोग्राफर, डेकोरेटर्स अशा अनेक घटकाचा समावेश आहे. मंगल कार्यालयावर अवलंबून असलेल्या २४ घटकांची आज संगमनेरमध्ये बसंत लॉन्स येथे राज्यव्यापी बैठक पार पडली. राज्य सरकारने मंगल कार्यालये आणि लॉन्सवरील निर्बंध उठवले नाहीत तर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अनलॉकमध्ये लग्न कार्याला ५० ऐवजी 500 ते 1000 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांनी दिला आहे.