चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत, हल्ल्यात सात ग्रामस्थांना केले ठार

सध्या या वाघाला जेरबंद करून ग्रामस्थांना भयमुक्त करण्याची गरज

0

चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या ‘आरटी १’ या वाघाने धुमाकूळ घातला आहे. सात ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या या वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राजुरा तालुक्यात या वाघाची मोठी दहशत आहे. वनविभागाची विविध पथकं सध्या या भागात तैनात आहेत. स्वतः वरिष्ठ अधिकारीही फिल्डवर उतरले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात ‘आरटी १’ या वाघाने सध्या धुमाकूळ घातला. जंगलातील नवेगाव या खेड्यात गोविंदा मडावी या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करत त्यांना ठार केलं. २८ सप्टेंबरच्या या घटनेनंतर आता वन विभागाने या वाघाला जेरबंद करण्यासाठी जोरदार मोहीम उघडली. वाघाच्या हल्ल्यात याआधी २५ नोव्हेंबरला मूर्ती साळवे, २५ डिसेंबरला चिचबोडी येथे मंगेश कोडापे,  ४ जानेवारीला संतोष खामनकर, १८ जानेवारीला २०१९ ला जोगापूर येथे वैशाली तोडासे, ६ मार्चला चुनाळा इथे इउद्धव टेकाम, १८ ऑगस्टला नवेगाव इथे वासुदेव कोंडेकर यांचा मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतशिवारं सामसूम आहेत. जनावरे गोठ्यात बांधली आहेत. वाघाला पकडण्यासाठी याआधी दोन वेळा आदेश निघाले. पण त्याला पकडण्यात यश आले नाही. आता नवेगाव इथे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वाघाला गोळ्या घाला, अशी मागणी केली जाते. त्यामुळे आता वाघाला पकडण्याची मोहीम तीव्र झाली. या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय अधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात राखीव वनक्षेत्रात मानव विरूद्ध वन्यजीव असा संघर्ष गेल्या काही वर्षात वाढला. वाघांच्या मृत्यूच्या संख्येतही चिंताजनक वाढ झाली. त्यातून मार्ग काढण्यासठी आता सर्वंकष उपाय गरजेचे आहेत. मात्र त्याआधी सध्या या वाघाला जेरबंद करून ग्रामस्थांना भयमुक्त करण्याची गरज आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.