आडूळ शिवारात भरधाव-कारची-दुचाकीला धडक; अपघातात तीन जण जखमी

आडूळ औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

0

औरंगाबाद :  आडूळ रस्त्यावर समोर चालत असलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव नॅनो कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन व कारचालक, असे तिघे जण गंभीर जखमी झाले असून  ही घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ (ता.पैठण) शिवारात शनिवारी (ता. 28) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

आडूळ रस्त्यावर समोर चालत असलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगाने नॅनो कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन व कारचालक, असे तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ (ता.पैठण) शिवारात शनिवारी (ता. 28) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. त्रिंबक हिरालाल बमनावत (वय 52), रुपसिंग हरसिंग घुनावत (वय 40), दोघे राहणार पिवळवाडी (ता.जि.औरंगाबाद) हे दुचाकी क्रमांक (एमएच 20 एएक्स 6405) ने रजापूरहून गावी पिवळवाडीकडे परतत असताना पाचोडकडून भरधाव वेगाने येणारी नॅऩो कार (क्र.एमएच 43 एएफ 104) ने पाठीमागून जोराची धडक देऊन दुचाकीला जवळपास पुढे शंभर फुटांपर्यंत फरपटत नेले. यात दुचाकीस्वार त्रिंबक बमनावत व संजय घुनावत हे दोघे जण तर दुचाकीला उडवल्यानंतर अपघातग्रस्त कारही रस्त्याच्या खाली जाऊन दोन तीन पलट्या घेतल्याने कारचालक रोकडे (रा.औरंगाबाद), असे एकूण तिघे गंभीर जखमी झाले आहेत. नेमके त्याचवेळी घटनास्थळावरून अवघे दोनशे फुटांच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्य बजावताना महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार बलभीम गोरे, पोलिस हवालदार राजू गोल्डे, दिलीप पाटील, ईश्वरसिंग जारवाल, पाचोड पोलिस ठाण्याचे रविंद्र क्षीरसागर आदी कर्मचाऱ्यांनी तात्काळ अपघातस्ळी धाव घेऊन मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस पुढील तपास करत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.