पळसखेडा पिंपळे येथील तीन शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने विहिरीत पडून मृत्यू

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'त्या 'कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन, कुटूंबाला सर्वतोपरी मदत

0

जालना :   भोकरदनमधील पळसखेडा पिंपळे येथील तीन शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘त्या ‘शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आाणि कुटूंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचना केल्या.

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील जाधव कुटूंबातील तीन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागल्याने विहिरीत पडुन मृत्यू झाला असुन घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. या प्रकरणाची चौकशी अत्यंत काळजीपूर्वक करण्याबरोबरच केमिकल ॲनॅलिसीसचा अहवाल तातडीने पाठविण्यात यावा. जाधव कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेबरोबरच शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातुन मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे  टोपे म्हणाले.  भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच या गावाला सुरळीतपणे वीज पुरवठा होण्याकरिता विद्युत विभागाला निर्देश देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलु चौधरी, रमेश सपकाळ, कैलास पुंताळे, सखाराम माने, अण्णासाहेब भालेराव, अरविंद थोटे यांच्यासह विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.