मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह तीन दिवस मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

0

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाळी वातावरण आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शनिवारी (9 जानेवारी) मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारपासून (12 जानेवारी) थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. शिवाय, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यात विजांच्या गर्जनेसह येत्या तीन दिवसांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, 12 जानेवारीनंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घट होण्याची शक्यता असेल. यामुळे थंडीत वाढ होऊ शकते.

राज्यात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.8 आणि 9 जानेवारीला मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईचे तापमान 24 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

दिल्लीत पाऊस की थंडी?

वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्लीचा पारा 1.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. तर एका आठवड्यानंतर गुरुवारी दिल्लीचा पारा 14.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला. दिल्लीतील हे गेल्या चार वर्षांतील जानेवारी महिन्यातील सर्वोच्चतम तापमान आहे. हवामान विभागानुसार, यापूर्वी 2017 मध्ये जानेवारीमध्ये 26 तारखेला दिल्लीचं तापमान 16 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. आज दिल्लीत सकाळी आणि सायंकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच दाट धुकेही पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.