पाळसखेड पिंपळे येथे शॉक लागून, तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची माहिती

0

जालना :  भोकरदन तालुक्यातील पाळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची माहिती असून यातील एकाचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (26), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (26) व सुनील आप्पासाहेब जाधव (18) हे तिघे भाऊ बुधवारी रात्रीचे जेवण करून 8 वाजेच्या दरम्यान शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. पाणी देण्यासाठी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, तीनही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान जोपर्यंत महावितरणवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृत्यदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. घटनास्थळी पोलिसांच्या तीन व्हॅन दाखल झाल्या आहेत.  तिघे भावंड रात्री उशीर झाला तरी तिघे घरी परतले नाही म्हणून जाधव कुटुंबीय चिंतेत पडले. मोबाईलवरील कॉल सुद्धा कोणीही उचलत नव्हते म्हणून त्यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके यांनी घटनास्थळी पाहणी केली.

तीन महिन्यापूर्वीच झाला होता विवाह

आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत. त्यापैकी धानेश्वरचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. इतर दोन मुले औरंगाबाद येथे कंपनीत काम करत होते. लॉकडाऊनपासून ते घरी आले होते. तीन कर्त्या मुलांच्या मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.