‘एवढ्या’ हजारात मिळणार प्लाझ्मा बॅग; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

प्लाझ्मा बॅगसाठी खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना कमाल दर आकारण्यास मान्यता

0

मुंबई  : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्याकरिता प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली.  अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रकमेची परतफेड संबंधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील; अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी तर केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये आकारण्यास मान्यता दिली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.