मुंबईत हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्स लपवले पाइपात

अफगाणिस्तानातून इराणमार्गे आणले होते भारतात; चौघांना अटक, सर्वात मोठे ड्रग रॅकेट!

0

मुंबई नवी मुंबईत किनारपट्टीवर तब्बल एक हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अफगाणिस्तानातून इराणमार्गे हे ड्रग्स रविवारी रात्री भारतात आणले जात होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्स एका पाइपमध्ये लपवून आणले होते. सोबतच, त्या पाइपला असे रंगवले होते की, ते बांबू दिसावे. या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे.

नवी मुंबईत किनारपट्टीवर  एक हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. अफगाणिस्तानातून इराणमार्गे हे ड्रग्स रविवारी रात्री भारतात आणले जात होते. गुप्तचर महसूल संचालनालय आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करांना पकडून जाब विचारला तेव्हा तर त्यांनी हे आयुर्वेदिक औषधी असल्याचा दावा केला. या कथित औषधी पाइपमध्ये लपवून का आणले, अशी विचारणा केली असता त्यावरही अजब उत्तर मिळाले. या विशेष आयुर्वेदिक औषधी असून त्या खराब होऊ नये म्हणून त्यांना असे ठेवण्यात आली होती असे तस्करांनी म्हटले. पण, सक्तीने चौकशी केली असता, तस्करांनी हे ड्रग्स असल्याची कबुली दिली. यामध्ये इंपोर्टसाठी कागदपत्रे तयार करणाऱ्या कस्टम हाउसच्या दोन एजंट आणि एका इंपोर्टरसह फायनांसरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही सोमवारीच मुंबईत आणले जात आहे. तत्पूर्वी पोलिसांनी एमबी शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशनच्या कस्टम एजंट मीनानाथ बोडके आणि कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाळ यांना अटक करून न्यायालयात हजर केले. या ठिकाणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या बोडकेने सांगितल्याप्रमाणे, मोहंमद नुमान नावाच्या एका व्यक्तीने त्याची दिल्लीतील एक्सपोर्टर सुरेश भाटियाशी भेट करून दिली होती. भाटिया याला आधी सुद्धा अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आतापर्यंतचे सर्वात मोठे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट असू शकते. यापूर्वी गतवर्षी पंजाबमध्ये दिल्ली पोलिसांच्या एसटीएफने 194 किलो हॅरोइन अमृतसर येथून पकडले होते. या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.