सांगली जिल्ह्यातून निघणारी ‘शिवप्रतिष्ठान’ची दुर्गा माता दौड रद्द

कोरोनामुळे दुर्गा माता दौड न काढण्याचा शिवप्रतिष्ठानचा निर्णय, भाविकांच्या उत्साहावर विरजन

0

सांगली : सांगली जिल्ह्यातून निघणारी शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली. पहिल्यांदाच ही दौड रद्द करण्यात आल्याने दुर्गा माता दौड निघण्याची गेल्या 35 वर्षांची परंपरा यामुळे खंडित होणार आहे. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी निघणाऱ्या दुर्गा माता दौडमध्ये राज्यातील विविध भागांतील हजारो भाविक सहभागी होतात.

सांगली जिल्ह्यातून निघणारी शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली. पहिल्यांदाच ही दौड रद्द करण्यात आल्याने दुर्गा माता दौड निघण्याची गेल्या 35 वर्षांची परंपरा यामुळे खंडित होणार. गणपती उठल्यानंतर भाविकांना आस लागते ती म्हणजे दुर्गा माता दौडची मात्र, या वर्षी कोरोनामुळे दुर्गा माता दौड न काढण्याचा शिवप्रतिष्ठानने निर्णय घेतल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. यंदाची दुर्गा माता दौड रद्द करण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. त्यामुळे यंदा दुर्गा माता दौड न घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचेही चौगुले यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून काही ठिकाणी कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे राज्यात सर्व खबरदारी घेत हळूहळू लॉकडाऊनचे सर्व नियम शिथिल करण्यात येत आहेत. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींना परवानगी मिळाली आहे. हॉटेलसह सर्वच व्यवहार अटी-शर्थींवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप धार्मिकस्थळे खुली करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.