‘हे सरपंच शंभर नंबरी सोने, 10 गावांत सापडणार नाही!’ कोरोनातही गावकऱ्यांची दिवाळी गोड

'गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त महत्त्वाचा आहे...' - भास्कर पेरे पाटील

0

औरंगाबाद :  औरंगाबादजवळ असलेले आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे. दिवाळीच्या सणात तर भास्कर पेरे पाटील सरपंचांनी उचललेल्या पावलामुळे अख्खे गाव त्यांचे कौतुक करत आहे. गावातील महिला इतक्या आनंदात आहेत की, दिवाळीत केवळ दोन गोड पदार्थ नाही तर चार करणार असल्याचे सांगतात.  या गावाची आणखी एक खासियत म्हणजे कोरोनाच्या संकटातही गावकऱ्यांनी 100 टक्के टॅक्स भरला, याची पोचपावती म्हणजे गावकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

कोरोनामध्ये सर्वांनाच मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यात पाटोदा गावातील तर अधिकतर जणांचे पोट जवळील औरंगाबाद शहरावर अवलंबून आहे. अशावेळी गावाचीही अर्थव्यवस्था बिघडली होती. मात्र असं असतानाही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबीयांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर  20 रुपयांनी दिली. यामुळे गावकऱ्यांना बाजारात 35 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर वीस रुपयांत मिळाली आणि तेही 25 किलो. याशिवाय गावाला आदर्श म्हणता येईल, असे अनेक उपक्रम येथे राबवले जातात. गावकऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, टॅक्स भरणाऱ्याला दळण फुकट, शेवया, कुरडया, पापड आणि डाळ फुकट करून मिळतात. यावर गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात गावात अतिशय योग्य ती काळजी घेतली गेली होती. गावात ठिकठिकाणी बेसिन्स बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिवाळी ही साजरी करताना गावकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी काय करता येऊ शकते, याची चर्चा सुरू होती. त्यातून एक प्रस्ताव पुढे आला की, दिवाळीत सवलतीच्या दरात साखर मिळाली तर बरीच मदत होईल. यासाठी आम्ही लातूरच्या एका कारखान्याशी संपर्क साधला. त्यानी आम्हाला 30 रुपये किलोने साखर देण्याचे ठरवले. मग ग्रामपंचायतीने काही भार उचलायचा निर्णय घेतला आणि आम्ही गावकऱ्यांना 20 रुपये किलोने साखर देण्याचे ठरवले. कोरोनाच्या संकटात ग्रामपंचायतीचा कर जर गावकऱ्यांनी नियमित भरला असेल तर त्यांची दिवाळी ही आनंदात जायला हवी, यातून ही संकल्पना पुढे आल्याचे भास्कर पेरे पाटील सरपंच यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.