‘ही’ व्यक्ती करणार अनुष्का आणि विराटच्या मुलीचे नामकरण
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी ११ जानेवारी रोजी सोनपावलांनी लक्ष्मी
मुंबई :अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे घर आनंदाने न्हाऊन निघाले. ११ जानेवारीला अनुष्काने कन्यारत्नाला जन्म दिला. स्वतः विराटने सोशल मीडियावर यासंबधीची माहिती दिली.
मीडिया अहवालानुसार, हे जोडपे आता आपल्या मुलीचे नाव एका महाराज्यांच्या आशीर्वादाने ठेवणार आहे.एका हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मा विराट आणि कोहलीच्या मुलीला नाव महाराज अनंत बाबा देणार आहेत. असे म्हटले जाते की, अनुष्का आणि विराट दोघेही महाराज अनंत बाबा यांना खूप मानतात. लग्नापासून ते घर घेण्यापर्यंतच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी अनंत बाबा यांना विचारूनच घेतले. दरम्यान, काल ११ जानेवारी रोजी विराटने त्याच्या सोशल मीडियावर ही आनंदाची वार्ता देत म्हटले की, ‘ हे सांगून आम्हाला आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभारी आहोत. विराटने पुढे लिहिले की, ‘अनुष्का आणि आमची मुलगी दोघींची प्रकृती ठीक आहे. आमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय आहे. आता आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची किती गरज आहे, याची तुम्हाला चांगली कल्पना असेल. त्यामुळे आता थोडी प्रायव्हसी द्या, अशी विनंती आम्ही करतो.’