औरंगाबादेत आज सकाळी कोरोनाच्या 60 हजार लसी दाखल, चार जिल्ह्यांचा उतरवला साठा

डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, आजच आम्ही चारही जिल्ह्यांत लस करणार रवाना

0

औरंगाबाद : कोरोनाशी मागील नऊ महिन्यांपासून कडवी झुंज दिली जात आहे. अखेर बुधवारी (१३ जानेवारी) सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी कोरोनाच्या ६० हजार लसी दाखल झाल्या.सिडको एन ५ येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात, औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांचा साठा उतरविण्यात आला आहे.

पुण्याहून लसी पहाटे ५ वाजता व्हॅक्सीन व्हॅन निघाली. सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी पोहोचली. वाहन चालक संजय चाबुकस्वार आणि आरोग्य पर्यवेक्षक शेखर आनंदे यावेळी सोबत होते. चाबुकस्वार म्हणाले, पुण्याहून विविध लसी आम्ही नियमित औरंगाबादला आणत असतो. कोरोनाची लस आणताना विशेष आनंद आहे. कारण हजारो परिवार या आजाराने उद्ध्वस्त केले आहेत. यापुढे कुणाचा जीव जाणार नाही. शेखर म्हणाले, पुण्याहून चार तासांत लस औरंगाबाद मध्ये आणली. सिडको एन ५ येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात, औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांचा साठा उतरविण्यात आला. येथून जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीचा साठा आजच पाठवला जाणार आहे. डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, चारही जिल्ह्यांत आजच लस रवाना करण्याची व्यवस्था आम्ही केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.