गच्चीवर थर्टी फर्स्टची पार्टी, सावधान; पोलिसांची करडी नजर

ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा, 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी 31 हजार पोलिस तैनात

0

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे यंदा 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी घरीच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करायचे ठरवले. मात्र, आता या पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, यावर पोलिसांकडून नजर राहणार आहे.
यंदा 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळेअनेकांनी घरीच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करायचे ठरवले. मात्र, आता या पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, यावर पोलिसांकडून नजर राहणार आहे. विशेषत: गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे 31 हजार पोलिस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे. 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणासाठी  नियमावली करण्यात  आली आहे.  मुंबईत रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत जमावबंदीचे नियम लागू आहेत. त्यामुळे गेट वे, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी येथे तुम्हाला संध्याकाळपासून जाता येईल. मात्र, चारपेक्षा कमी लोक असणे ही मुख्य अट आहे.

बारमधील पार्ट्या 11 च्या आतच आटोपणार : एरवी 31 डिसेंबर म्हटले की, मुंबईतील पब, बार आणि रेस्टॉरंटसमध्ये उत्सवाचे वातावरण असते. मात्र, यंदा नाईट कर्फ्यूमुळे या पार्ट्या अकराच्या आतच आटोपाव्या लागणार आहेत. रात्री अकरानंतर पब्ज आणि डिस्को बंद असतील. 31 डिसेंबरच्या रात्री आणि त्यानंतर पहाटे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तळीरामांना रोखण्यासाठी पोलिसांनी नेहमीप्रमाणे खास बंदोबस्त केला आहे. यंदा कोरोनामुळे चालकांची ब्रिथ अनालायझरद्वारे तपासणी होणार नाही. पण व्यक्ती मद्यधुंद असल्याचे आढळल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी केली जाईल.

5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू : राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण यूरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.