औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, ‘वंचित’चा आक्षेप

पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार

0

औरंगाबाद : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झाले. औरंगाबाद, पुणे, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झाले आहे.

आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील. औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली  असून पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रत्यक्ष बॅलेट पेपर मोजायला सुरुवात झाली , 56 टेबलवर मोजले जात आहेत बॅलेट पेपर, सुरुवातीला होणार पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, पहिल्या पसंतीत कुणाचाच विजय नाही झाला तर मोजली जाणार दुसऱ्या पसंतीची मते, दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली तर निकालाला उजडणार दुसरा दिवस, 290 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे मतमोजणी , 2 लाख 40 हजार 649 बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे. औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.