चोरी गेलेल्या सात दुचाकींसह चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

करमाड पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकी चोरट्यांकडून जप्त, दोन आरोपीना अटक

0

करमाड  : औरंगाबाद तालुक्यात लॉकडाऊन काळात दुचाकी चोरी जाण्याच्या घटनांत वाढ झाली होती. करमाड परिसरातील शेकटा येथून बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी एक बुलेट  दुचाकीची चोरी गेल्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने करमाड पोलिसांनी या घटनांचा छडा लावण्यासाठी  सूत्रे फिरवून विशेष पथकाव्दारे सापळा रचून दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले.
सदर आरोपी तपास औरंगाबाद तालुक्यातील शेकटा येथून बुलेट चोरीला गेल्यामुळे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांना दुचाकी चोर पकडण्यासाठी विशेष पथकाच्या मदतीने सापळा रचून छडा लावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोउपनि सुतळे यांनी त्यांचे औरंगाबाद येथील मित्रांच्या मदतीने जालना येथे जुनी बुलेट खरेदी करण्यासाठी सापळा रचला असता, त्यात शेकटा येथून चोरीस गेलेली बुलेट संजय कारभारी अंभुरे (रा.जालना) यासह आढळली. त्यास अटक करून करमाड पोलिस ठाण्यात घेऊन येत चौकशी केल्यानंतर त्यामध्ये  अमोल बागुल (रा. जालना)  मछिंद्र घोरपडे (रा.चांदाई ता.भोकरदन जि.जालना) ही नावे समोर आली. त्यावरून मच्छिंद्र घोरपडे यास अटक करण्यात आली.  संजय अंभुरे व मच्छिंद्र घोरपडे यांच्याकडून एकूण चोरी केलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. या चोरट्यांनी बहुतांश दुचाकी या औरंगाबाद घाटी रुग्णालय परिसरातून चोरी केल्याचे कबूल केले. पुढील तपास करमाड पोलिसांच्या वतीने करण्यात येत असून आरोपी अमोल बागूल हा फरार असून त्याच्याकडून आणखी चोरी केलेल्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. सदर चोरीच्या घटनेतील आरोपीचे संजय अंभुरे, (रा.जालना), अमोल बागुल (रा. जालना), मछिंद्र घोरपडे (रा.चांदाई ता.भोकरदन जि.जालना) असे आरोपींची नावे आहेत. करमाड पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकी चोरट्यांकडून जप्त केल्या.  दोन आरोपीना अटक तर एक फरार झाला.  सदर गुन्हा उघडकीस उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांचे मार्गदर्शनाखाली, पो.नि.संतोष खेतमाळस, पोउपनि सुशांत सुतळे यांच्यासह पोलिस हवालदार भताने, पोलिस नाईक तारचंद घडे, पोकॉ, आनंद घाटेश्वर, सायबर पोना योगेश टरमाळे यांनी कामगिरी बजावली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.