…तर अख्खे मंत्रालय पेटवून देऊ, अखिल भारतीय मराठा महासंघाचा संतप्त इशारा

सरकार जर त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा एक मजला जाळू शकते तर...

0

जालना : मराठा आरक्षणाच्या  प्रश्नावर जालन्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठ्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. सरकार जर त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा  एक मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास मराठा समाज अख्खे मंत्रालय पेटवू शकतो, असा संतप्त इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या  प्रश्नावर जालन्यातील मराठा समाज आक्रमक झाला. मराठ्यांनी पुन्हा एल्गार पुकारला. सरकार जर त्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी मंत्रालयाचा  एक मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास मराठा समाज अख्खे मंत्रालय पेटवू शकतो, असा संतप्त इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला ते म्हणाले, अगोदरच्या सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण, असा होता तर आताच्या सरकारचे धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलांचे मरण, असे आहे. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लगेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती न करण्याची मागणी अरविंद देशमुख यांनी केली आहे. दुसरीकडे, मराठा ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सकल मराठा समाजाच्या पायी दिंडीला सुरूवात झाली आहे. पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, पंढरपूर पोलीस मुख्यालयासमोर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा अडवण्यात आला. पोलिस मराठा कार्यकर्त्यांना धरपकड करण्याच्या तयारीत असल्याने वातावरण तापले आहे. पोलिस आणि मराठा समन्वयकामध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पंढरपूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतले असून त्यांना पुण्याच्या दिशेने नेण्यात आले आहे. पायी दिंडीला पोलिस प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. दहा खासगी वाहनातून पोलिस बंदोबस्तात मराठा समन्वयक पुण्यामध्ये पोहोतील. त्यानंतर पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, सुमारे 500 पोलिस तैनात असून ड्रोनद्वारे हालचालींवर नजर ठेवली जाईल. दुसरीकडे, पंढरपूरकडे निघालेल्या मराठा तरुणांना पोलिसांनी अडवले आहे. 144 कलम लागू असल्याने त्यांना पंढरपुरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. कळंब पोलिसांनी आंदोलकांना नजरकैदेत ठेवले आहे. 149 नुसार 12 कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात सरकार योग्य उपाययोजना करत नसल्या कारणाने समाजामध्ये तीव्र खदखद आहे. ती आमदार विनायक मेटे यांच्या मशाल मार्च व मराठा क्रांती ठोक मोर्चा यांचा दिंडीमधून व्यक्त होत आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणा संदर्भात ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी बीडमधील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, वकील आणि मराठा समाजातील तरुण अशा भावना व्यक्त करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.