‘…तर राजकारण सोडून हिमालयात जाईन’, चंद्रकांत पाटलांचे विरोधकांना आव्हान

पराभवाच्या भीतीने चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्यात आल्याची टीका - मंत्री उदय सामंत

0

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटल्यानेच चंद्रकांत पाटील  हे घाबरून कोल्हापूर सोडून पुण्यात आले, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली होती त्याला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. पुण्यात कार्यकर्त्यांसमोर  बोलताना त्यांनी टीका करणाऱ्यांना खुले आव्हानच दिले. हिंमत असेल तर पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल, असे ते म्हणाले.

पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश मला पक्षाने दिला. तुम्ही पुण्यातून निवडणूक लढवावी, असे मला त्यावेळी अमित शहा यांनी सांगितले होते. त्यावर मी त्यांच्यासोबत बराच युक्तिवाद केला. कोल्हापूर सोडून गेलो तर चुकीचा संदेश जाईल, असे मी म्हणालो. पण सगळा युक्तिवाद ऐकून झाल्यावर त्यांनी मला कोथरूडमधूनच निवडणूक लढण्याचा आदेश दिला. पक्षाने आदेश दिल्यावर तो अंतिम असतो. त्यामुळे मी लढलो असेही पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातून ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लढवावी, त्यात जिंकून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, असे आव्हानही त्यांनी दिले. अनेक वर्षे पक्ष संघटनेत काम केलेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत असलेले पाटील हे अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पाटील म्हणाले, पक्षाने आदेश दिला की, तो ऐकावाच लागतो. माझ्यावर कितीही टीका झाली तरीही मी कधी उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. मी पंतप्रधान मोदींकडून हे शिकलो. कितीही टीका होवोत आपण आपले काम करत राहायचे हे माझे तत्व आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.