पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात चोरी! 38 लाखांचे साहित्य लंपास

कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य चोरीची माहिती

0

बीड :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमील शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचे शटर उचकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार, अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रकरणात 22 डिसेंबर रोजी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपासाला सुरुवात केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.