तरुणीचा धर्म बदलून लग्नानंतर इतरांशी शारीरिक संबंध; दोघांना पोलिस कोठडी

बजाजनगर भागातील पीडितेच्या आई, वडिलांनाही आराेपींकडून ठार मारण्याची धमकी

0

औरंगाबाद  : वाळूज एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीवर बळजबरी अत्याचार करून तिला लग्न करण्यास भाग पाडले तसेच तिचा धर्म बदलून तिला दुसऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास बळजबरी करणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली.

एका २६ वर्षीय तरुणीवर बळजबरी अत्याचार करून तिला लग्न करण्यास भाग पाडले तसेच तिचा धर्म बदलून तिला दुसऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास बळजबरी करणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. मोहंमद उमर जावेद मोहंमद (२५, नॅशनल कॉलनी) व मोहंमद इस्माईल मोहंमद अश्रफ (४०, मकसूद कॉलनी) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी दिले. पीडित तरुणी बजाजनगर येथील रहिवासी आहे. ती मोहंमद उमर या तरुणाच्या प्रेमात पडली. नंतर उमर याने जून २०१९ मध्ये तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्या वेळी मोहंमदसह तिघांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे पीडितेने सातारा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहंमद उमर याचा मामा मोहंमद इब्राहिम मोहंमद अहेमद, आई रिहाना बानो, मामी हुस्ना बेगम यानी पीडितेला आणि तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे  तर पीडितेचा लैंगिक अत्याचार करतेवेळीचा व्हिडिओ दाखवून तिचे धर्मांतर करून मोहंमद उमर याच्यासोबत लग्न करावयास भाग पाडले होते.

लग्नानंतर इतरांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले : या पीडित तरुणीवरील अत्याचार येथेच थांबले नाहीत तर लग्नानंतर पती मोहंमद उमर, त्याचा मामा मोहंमद इब्राहिम, मामी हुस्ना बानो हे सर्व तिला वेगवेगळ्या लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते. पीडितेने त्यास विरोध केल्यास तिला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देण्यात येत होती. ती तीन महिन्यांची गर्भवती असताना तिच्या पतीने तिला ३० सप्टेंबर रोजी बेदम मारहाण केली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या पती उमर आणि मोहंमद इस्माईल मोहंमद अश्रफ या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी पीडिता व आरोपीचा तो व्हिडिओ जप्त करणे आहे, गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना अटक करायची असून आरोपींनी यापूर्वी कोणकोणत्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले, याचाही तपास बाकी असल्याचे कारण पुढे करत त्यांना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.