पंढरपूरमधील कुंभार घाटाची भिंत कोसळली, चार जणांंचा मृत्यू

कुंभार घाट कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण अडकल्याची भीती

0

पंढरपूर : शहरात गेल्या 15 तासांपासून अखंड पावसाचा धुमाकूळ, सुरू असताना आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भीत कोसळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

पंढरपूर येथे कुंभार घाटाची भिंत कोसळली. शहरात 15 तासांपासून संततधार  पावसाचा धुमाकूळ, सुरू असताना आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  या घाटावर एरिकेशन विभागाकडून या घाट बांधण्याचे काम सुरू होते.  या ठिकाणी आडोशाला उभ्या असलेल्या चार जणांचा या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू  झाला. तेथे अद्यापही शोधकार्य सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले हे सर्वजण तेथेच झोपडी करून  तेथेच राहतात. यांची या घाटावर दुकाने आहेत. काल रात्रीपासून जवळपास 12 ते 14 तास पाऊस सुरू आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पावसामुळे निवाऱ्याला म्हणून ते आडोशाला उभे होते. सध्या ढिगारा उपसण्याचे काम आणि शोधकार्य सुरू आहे. यासाठी पोलिस विभाग आणि अग्निशमन दल हे मृत देह शोधण्याचे काम करत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.