सर्वांत पहिला एक्झिट पोल; नितीश कुमारांसह भाजपला झटका?

बिहार विधानसभेच्या या रणसंग्रामात कोण ठरणार 'किंगमेकर'?

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूकीसाठीच्या  मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी संपला. मतदानोत्तर चाचणीत बिहारमधल्या मतदारांचा कल स्पष्ट झाला. मतदानानंतरचे पहिले कल हळूहळू समोर येत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सी वोटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये जेडीयू आणि भाजप आघाडीसह एनडीएला फक्त 116 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. याउलट राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेसच्या यूपीए आघाडीला 120 जागा मिळण्याची शक्यता आहे. सी वोटर चा अंदाज

जेडीयू 70

भाजप 42

आरजेडी – 85

काँग्रेस 25

आणखी एका एक्झिट पोलमध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला फक्त 28 ते 35 जागा मिळू शकतात. तर भाजपला गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यांना 65 ते 70 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

राष्ट्रीय जनता दल ठरणार मोठा पक्ष

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी लढत आहे. नितीश कुमार  की तेजस्वी यादव याचा मतदानोत्तर चाचणीत कल तपासण्यात आला. आता 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी बिहारचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

एबीपी आणि सी वोटरचा अंदाज

एकूण जागा – 243

भाजप – 66-74

जेडीयू– 38-46

आरजेडी– 81-89

काँग्रेस – 21-29

एलजेपी – 2

एलईएफटी 6-13

रालोसप – 1-3

अन्य 4-8

टाईम्स नाऊचा अंदाज

एनडीए 116

यूपीए 120

इतर 07

रिपब्लिक जन की बात चा अंदाज

एकूण जागा – 243

एनडीए 91-117एमजीबी/यूपीीए 118-138

एलजेपी 5-8

इतर 3-

28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झाले. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल  आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल  आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातील लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला गेल्या निवडणुकीत  71 जागा मिळाल्या होत्या. या वेळी जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही ती लोकजनशक्ती पक्षामुळे.एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला, पण आपला भाजपला विरोध नसल्याचं स्पष्ट केले. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत  आरजेडीने 144 जागा लढवल्या तर काँग्रेसने 70 आणि सीपीआय (एमएल)  ने 19 जागा लढवल्या. एनडीएकडून नितीश कुमारांच्या जे (यू) 115 जागा लढवल्या तर भाजपचे उमेदवार 110 जागांवर उभे होते. गेल्या वेळच्या बिहार विधानसभा निवडणुकीने सगळ्यांचे अंदाज चुकवले होते. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचा अनुभव त्या वेळी होता. मागच्या बिहार विधानसभेला भाजप आणि नितीश कुमार एकमेकांच्या विरोधात होते. एनडीएमध्ये नितीश कुमार नव्हते. त्याऐवजी काँग्रेस आणि केंद्रात भाजप बरोबर एनडीएचा भाग असले तरी पासवानांनी बिहारमध्ये नितीश विरोध कायम ठेवला होता. या निवडणुकीत तो आणखी तीव्र केला. एकीकडे काँग्रेस- आरजेडी यांच्या विरोधात आणि दुसरीकडे नितीश कुमार यांच्याही विरोधात पासवान असल्याने त्यांच्या पक्षाला मिळणारी मतं कुणाला मोठं नुकसतान करतात, यावर बिहारचं भवितव्य ठरू शकते. निवडणुकीच्या अगदी थोडे दिवस आधी पक्ष संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. बिहारचे किंग मेकर ठरण्याची त्यांची इच्छा होती. पण मतदानोत्तर कल चाचणीत लोकजनशक्ती पक्षाला दिलेला कौल फारसा मोठा दिसत नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.