शेतातील विहिरीवर विजेचा शॉक लागल्याने पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू

लाडसावंगी येथे धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील कर्तेपुरुष गेल्याने परिसरात हळहळ

0

करमाड : औरंगाबाद तालुक्यासह सर्वत्र गेल्या चार दिवसापासुन रिमझिम पाऊस पडत आहे. शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, वीजवाहिनीचा वीजप्रवाह हा लोखंडी खाबाला लागून जमिनीवर उतरल्यामुळे त्याठिकाणी त्यांचा संपर्क झाल्याने वीजप्रवाहाचा जोरदार  शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी मृत्यू झालेल्या पिता पुत्राचे नाव पिता किसन बालाजी भावले (वय ५७) व  पुत्र विठ्ठल किसन भावले (वय २६ रा लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद) असे त्यांचे नाव आहे.

लाडसावंगी (ता.औरंगाबाद) येथील गट नं. १५१ मध्ये किसन  बाळाजी भावले (वय ५७) हे आपल्या घरात पाणी नसल्यामुळे शुक्रवारr १४ ऑगस्ट सकाळी शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, वीजवाहिनीचा वीजप्रवाह हा लोखंडी खाबाला लागून जमिनीवर उतरल्यामुळे त्याठिकाणी त्यांचा संपर्क झाल्याने वीजप्रवाहाचा जोरदार  शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी मृत्यू झालेल्या पिता पुत्राचे नाव पिता किसन बालाजी भावले (वय ५७) व  पुत्र विठ्ठल किसन भावले (वय २६ रा लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद) असे त्यांचे नाव आहे. वडील घरी परत आले नसल्याने त्याचा मुलगा विठ्ठल किसन भावले (वय २६) हा आपल्या वडिलांना पाहण्यासाठी शेतात विहिरीवर गेला असता, त्याने वडिलांना पहिले व त्यांच्याजवळ गेला; मात्र त्यालाही शॉक लागल्याने काळाने त्यालाही हिरावून घेतले. वीजप्रवाह लोखंडी खाबाला लागल्याने त्यात बाप-लेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.