‘या’ दोनच ठिकाणांहूनच देशभर ‘तिरंगा राष्ट्रध्वजा’चा होतो पुरवठा

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तिरंगा राष्ट्रध्वजाची साठ टक्क्यांनी घटली मागणी

0

नांदेड : देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला देखील करोनाचे ग्रहण लागले आहे. देशात कर्नाटकमधील हुबळी (जि. धारवाड) व नांदेड या दोनच ठिकाणांहूनच देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा होतो. पण यंदा मात्र स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे साठ टक्क्यांनी मागणी घटली आहे.

नांदेड शहरात मराठवाडा खादी ग्रामउद्योग समितीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.देशाच्या राजधानीत लाल किल्ल्यावरील फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला देखील करोनाचे ग्रहण लागले आहे. देशात कर्नाटकमधील हुबळी (जि. धारवाड) व नांदेड या दोनच ठिकाणांहूनच देशभर तिरंगा राष्ट्रध्वज पुरवठा  केला जातो. पण यंदा मात्र स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे साठ टक्क्यांनी मागणी घटली.  विविध दहा आकाराचे राष्ट्रध्वज इथे तयार केले जातात. देशातील महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तेलंगणा, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, चंदिगढ, पॉंडेचरी यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यात तिरंगा ध्वज  पाठविला जातो. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही उलाढाल 70 ते 80 लाख रुपये असते. मात्र यावर्षी तिरंग्याच्या मागणीत साठ टक्क्याने घट झाली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.