शहरात कोसळलेल्या धो-धो पावसाने नागरिकांची उडाली त्रेधातिरपीट
औषधी भवनजवळील नाल्याच्या पुरात आठ ते दहा दुचाकी वाहिल्या
औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज दुपारी पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली. तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळला.
आज शहरात दुपारी पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली. तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. रस्त्यावरील फळभाजी विक्रेते आणि नागरिकांची धांदरफळ उडाली. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना पाण्यातून रस्ता शोधताना जीव मुठीत धरून वाट काढत होते. या पावसाने सिडको हडको, शहागंज, औरंगपुरा, गारखेडा परिसर आदी भागात पाणीच पाणी केले. रस्त्यावरून नदी वाहिल्याचे चित्र दिसले. नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यातच औषधी भवन जवळील नाल्याला मोठा पूर आला. या भागात पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी या नाल्यात वाहत आल्या. गेल्या काही वर्षात या नाल्याला एवढा मोठा पूर पहिल्यांदा झाल्याचे नागरिकांनी सांगितले.