तारा निखळला! ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

राजीव कपूर हे राज कपूर यांचे कनिष्ठ चिरंजीव व ऋषी आणि रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ

0

मुंबई :  राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.राजीव कपूर हे राज कपूर यांचे कनिष्ठ चिरंजीव व ऋषी आणि रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ
राज कपूर यांचे कनिष्ठ पुत्र व अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.राजीव कपूर हे राज कपूर यांचे कनिष्ठ चिरंजीव व ऋषी आणि रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ
राज कपूर यांचे कनिष्ठ पुत्र व अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला होता.भाऊ रणधीर कपूर यांनी चेंबूरच्या इनलॅक्स रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. राजीव यांनी त्यांच्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा राम तेरी गंगा मैली आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव यांनी मुख्य भूमिका साकारली होती. वडील राज कपूर यांनीच या चित्रपटटाचे दिग्दर्शन केले होते. 1990 आालेला जिम्मेदार हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. यानंतर राजीव यांनी कुठल्याच चित्रपटात अभिनय केला नाहीी. यानंतर त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत मिळून हिना या चित्रपटाची निर्मिती केली. यात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते्. अभनय व निर्मितीशिवाय राजीव कपूर यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही आपले मशीब आजमावले. प्रेमग्रंथ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. या चित्रपटातहीी भाऊ ऋषी कपूर यांनीच मुख्य भूमिका साकारली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.