महाराष्ट्राच्या सुपुत्राने जिवाची बाजी लावत वाचवले अनेकांचे प्राण

कॅप्टन दीपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार याांनी गमावला जीव

0

नवी दिल्ली:  केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 123 प्रवासी जखमी झाले तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या अपघातात आपला जीव गमावून अनेकांचे जीव वाचवणारे कॅप्टन दीपक साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. कॅप्टन दीपक वसंत साठे हे एअर फोर्सचे टेस्ट पायलट होते. एअर फोर्सचे टेस्ट पायलट अनेक एयरक्राफ्टवर टेस्ट करत असतात.
केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला. एअर इंडियाचे विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमान दरीत कोसळले आणि विमानाचे दोन तुकडे झाले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे.
दुबईहून कालिकत येथे येणारे एअर इंडियांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. रनवेहून घसरुन पुढे हे विमान निघून गेल्यामुळे ही दुर्घटना घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे. या अपघात झालेल्या विमानाचे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार हे दोघे होते. कॅप्टन दीपक साठे हे फायटर पायलट होते.
दीपक साठे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (एनडीए) चे माजी विद्यार्थी होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते. एअर फोर्समधील एक कुशल लढाऊ पायलट, असा त्यांचा लौकिक होता. वायुसेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त कॅप्टन दीपक साठे यांनी मिग विमाने सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही पायलट कॅप्टनने आपला जीव गमावून जवळपास 170 लोकांचा जीव वाचवला. सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे संचालक एअर वायस मार्शल मनमोहन बहादूर यांनी साठे यांच्याविषयी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, दीपक साठे माझ्यासोबत टेस्ट पायलट म्हणून होते. ते अनुभवी पायलट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मी बोललो. अधिकारी घटनास्थळी आहेत, जखमींना सर्व मदत मिळत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.