लेकाच्या निधनाचा धक्का, हंबरडा फोडून माऊलीनेही सोडले प्राण
मुलाच्या निधनाचा धक्का बसलेल्या वृद्ध मातेनेही सोडले प्राण, मायलेकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
लातूर : लातूर जिल्ह्यात कर्नाटक सीमावर्ती भागातील लखनगावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. भालकी तालुक्यातील लखनगावामध्ये 60 वर्षीय गोविंद चांदीवाले राहत होते. ते औराद-शहाजनी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गोविंद चांदीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मुलाच्या निधनाचा धक्का बसलेल्या वृद्ध मातेनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना लातुरात घडली.
लातूर जिल्ह्यात कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या लखनगावात या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. भालकी तालुक्यातील लखनगावामध्ये 60 वर्षीय गोविंद चांदीवाले राहत होते. ते औराद-शहाजनी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. गोविंद चांदीवाले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. गोविंद यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबच शोकसागरात बुडाले. लेकाने डोळे मिटल्याच्या धक्क्यातून 87 वर्षीय मातोश्री सावरू शकल्या नाहीत. अनुसया चांदीवाले यांना आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करता आले नाही. सर्वांसमोरच त्यांनी एकच हंबरडा फोडला आणि त्या गतप्राण झाल्या. अत्यंत शोकाकुल वातावरणात माय-लेकावर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.