पोलिसांच्या लाचखोरीच्या वाढत्या घटना; पोलिस आयुक्तांचा ठाणे प्रमुखांना इशारा

'यापुढे लाचखोरीचे प्रकरण; संबंधित ठाणे प्रमुखाचीच उचलबांगडी'- पोलिस आयुक्त निखील गुप्ता

0

 औरंगाबाद : सातारा पोलिस ठाण्याच्या जमादाराने दहा हजाराची लाच घेतल्याचे प्रकरण समोर येताच. शहर पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सर्व पोलिस निरीक्षकांना चांगलाच दम दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी केली जाईल. अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलिस निरीक्षकांना दिल्या.

दोन महिन्यांच्या काळात शहरात चार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई झाल्या आहेत. या कारवाई लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. बुधवारी लाच प्रकरणात चौथी कारवाई होती. ही कारवाई झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी या कारवाईसाठी संबंधीत पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संबंधित अधिकारी पोलिस ठाण्यात दफ्तर तपासणी नीट करत नाहीत. डॉ. गुप्ता यांनी शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त हे ही नियमित पणे पोलिस ठाण्याला भेट देण्याची सूचना केली. भेटी दरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी चिकीत्सक पदधतीने पाहणी करावी. संशयित पोलिस कर्मचाऱ्यांबाबत योग्य ती कारवाई करावी. संशयास्पद पोलिस कर्मचाऱ्यांकडे गुन्ह्यांचा तपास देण्यात येऊ नये. तसेच पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या तक्रारी किंवा तक्रारदाराचा आढावा घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करावी.
बुधवारी झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर एकही लाचेचे प्रकरण शहर पोलिस विभागात आढळल्यास संबंधीत पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याची बदली करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील. याशिवाय अशा प्रकरणात संबंधीत ठाणे प्रमुखांना कारणे दाखवा नोटीसही बजाविण्याचा आदेश डॉ. गुप्ता यांनी दिला.लाचेच्या प्रकरणात पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी फक्त पोलिस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह ठाणे प्रमुखांना बजावले असे नाही. तर त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणुन कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही नियमित तपासणी करून आलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन त्या प्रकरणातील प्रगती तपासणी घ्यावी, असे आदेश दिले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.