मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, राज्यात पावसाची हजेरी

अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार

0

पुणे : राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. अनेक ठिकाणी नागरिकांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागले. नद्या, तळे, धरणे ही तुडुंब भरली. यामुळे यंदा पाण्याची चिंता मिटली.  उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली.

अरबी समुद्राच्या काही भागांमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. लवकरच महाराष्ट्रामधूनही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय आहे. त्यामुळे या भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. डोंगराळ पट्ट्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळू  शकतात. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.