बिहारचा खरा निकाल अजून लागायचाय, तीन कोटी मतांची मोजणी बाकी

अनेक मतदारसंघात काँटे की टक्कर, सात जागांवर तर मतांचा फरक 200 पेक्षाही कमी

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संथ वेगामुळे प्रत्यक्ष निकाल स्पष्ट होण्यास आणखी सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या जवळपास 30 हजारांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत साधारण 20 टक्केच मतांची मोजणी होऊ शकली होती. अद्याप 3 कोटी मतांची मोजणी बाकी असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

दुपारी एक वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बिहारमधील 166 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये फक्त 5000 मतांचा फरक आहे. तर 80 जागांवर हा फरक 2000 मतांपेक्षाही कमी आहे. 49 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये 1000 मतांचा फरक आहे. तर 500 पेक्षा कमी मतांचा फरक असलेल्या मतदारासंघाची संख्या 20 इतकी आहे. एवढेच नव्हे तर अटीतटीची लढत सुरु असलेल्या सात जागांवर तर मतांचा फरक 200 पेक्षाही कमी आहे. त्यामुळे आगामी काही तासांत संपूर्ण चित्र पालटूही शकते. एरवी बिहारमध्ये 73 हजार मतदान केंद्रे असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक मतदान केंद्रांवरील मतमोजणी करायची आहे. या केंद्रांवर मतमोजणीच्या कमीतकमी 23 ते जास्तीत जास्त 51 फेऱ्या पार पडू शकतात. त्यामुळे मतमोजणीला आणखी वेळ लागेल, अशी माहिती एच.आर. श्रीनिवासन यांनी दिली होती. बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या दोन तासांत हे चित्र संपूर्णपणे पालटले असून आता भाजपप्रणित आघाडीने भक्कम आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास 127 तर महागठबंधन 104 जागांवर आघाडीवर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.