पावसामुळे ओढ्याच्या पुरात दुचाकींसह चार जण गेले वाहून

दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये घडली घटना

0

पुणे  : दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये घडली घटना. पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकींसह चार जण  वाहून गेले. पुण्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. जागोजागी घरांमध्ये पाणी शिरले तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. शहर आणि जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.

तिघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. हे चौघे जण दोन दुचाकीवरुन ओढ्यातून जात होते. दरम्यान भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेल्याची माहिती मिळाली. शहाजी गंगाधर लोखंडे (52), सुभाष नारायण लोंढे (48), अप्पासाहेब हरीचंद्र धायतोंडे (55) आणि कलावती अप्पासो धायतोंडे (48) अशी त्यांची नावे आहेत. यामधील तिघांचे मृतदेह सापडले आहेत तर एकाचा मृतदेह अद्यापही बेपत्ता आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागोजागी घरांमध्ये पाणी शिरले आहे तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. दरम्यान बुधवारी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर रौद्ररूप धारण केले होते. यामुळे सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ते बंद झाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.