पावसामुळे सोयाबीनला कोंब, कपाशीची बोंडेंही सडली; बळीराजा आर्थिक संकटात

शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचे प्रचंंड नुकसान

0

अमरावती : यंदा पेरणी झाल्यानंतर बोगस बियाणांमुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून कसाबसा शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा आता अतिपावसामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तिकडे पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारी कापसाची बोंडेही आता अतिपावसामुळे जमिनीवर सडायला लागली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे.

यावर्षी सुरुवातीलाच  शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यानंतर त्यामधून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिकांचं संरक्षण केलं. त्याला खतपाणी दिले. परंतु मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक, भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा आता कोमेजल्या आहेत. सोयाबीन पूर्णत: काळे पडत असल्याने दहा टक्केही होण्याची शेतकऱ्यांची आशा आता मावळली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. मागील वर्षीही सोयाबीन काढणीला आलेल्या वेळेतच मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या वर्षीदेखील सोयाबीन काढणीच्या वेळेस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 30 हजार हेक्‍टरवर सोयाबीन पीक घेतलं जातं. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुड मोर्शी तालुक्यातही पावसाने जबर फटका बसला आहे. संत्र्याला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे. अलीकडे महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला, त्या अनुषंगाने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपच्यावतीने राज्य सरकारला करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.